सकाळ वृत्तसेवा
मुघलांनी भारतावर शेकडो वर्षे राज्य केलं. त्यांच्या अय्याशीच्या कथा इतिहासाच्या पानांमधून पुढे येतात
मुघलांनी हरम नावाची एक व्यवस्था उभी केली होती, त्यात महिलांचा अतोनात छळ होत असत.
हरममध्ये विविध ठिकाणांहून आणलेल्या महिला टाकल्या जायच्या. मुघल बादशाह आणि शहाजाद्यांच्या राण्यात तिथेच रहायच्या.
हरममध्ये काही महिलांची मात्र चैन असे. त्यांना तिथून बाहेर पडता येत नसलं तरी त्यांच्या इशाऱ्यावर गोष्टी घडत.
मुघल बादशहा आपल्या बेगमांच्या सगळ्या आवडी पूर्ण करण्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे खर्च करायचे.
हरममधल्या राण्या शाही शौक ठेवायच्या. एकदा वापरलेली गोष्ट पुन्हा कधीच वापरत नसायच्या.
त्यांचे कपडेसुद्धा त्या पुन्हा वापरत नसायच्या. एकदा वापरलेल्या कपड्यांकडे त्या ढुंकूनही बघत नव्हत्या.
हरममध्ये राहणाऱ्या राण्या जे कपडे एकदा घालत असत, त्याचा स्पर्श पुन्हा कधीच शरीराला होऊ देत नव्हत्या.
राण्यांनी वापरलेले कपडे त्यानंतर दासी वापरायच्या. त्यामध्ये हवे तसे बदल करुन कपडे पुन्हा वापरात यायचे.