संतोष कानडे
मुघलांच्या हरममध्ये राहणाऱ्या स्त्रीयांना त्यांच्या मूळ नावाने बोलावलं जात नव्हतं. येथील महिलांसाठी मुघलांनी कठोर नियम बनवलं होते.
हरममध्ये विविध देशांच्या स्त्रीया रहायच्या. काही महिलांना मुघलांनी कैद करुन आणलेलं होतं तर काहींवर बादशहांची नजर बसायची.
हरममधल्या अनेक महिलांना खरेदी केलेलं असायचं. त्यामुळे त्यांची मूळ ओळख जाहीर होऊ नये, यासाठी नाव बदलली जायची.
हरममधल्या कोणत्याही महिलेचं खरं नाव कुणालाही माहिती नसायचं. या महिला बादशहांच्या शारीरिक गरजा पूर्ण करायच्या.
हरममधल्या महिलांना बादशहाच्या बेडवर जावं लागत असल्याने त्यांच्यापासून बादशहांना धोका निर्माण होण्याची शक्यता असायची.
बादशहाच्या जिवाला धोका होऊ नये, कुठलंही षड्यंत्र सिद्धीस जाऊ नये, यासाठी महिलांची खरी नावं जाहीर केली जात नसत.
असं केल्याने कुठली महिला बादशहासोबत कधी गेली किंवा कधी जाणार, हे कुणालाही कळायचं नाही. सुरक्षेच्या दृष्टीने असं केलं जायचं.
हरममध्ये एकदा एखादी महिला गेली तर तिला पुन्हा स्वातंत्र्याचा सूर्य कधीच नजरेस पडत नसे. तिथेच ती वृद्ध होईल आणि तिथेच मृत पावत असे.
महिलांना केवळ भोग-विलासाचं साधन म्हणून बघितलं जात होतं. केवळ बादशहांना खूश ठेवण्याची त्यांच्यावर जबाबदारी असे. त्यांचा विचार केला जात नसे.