मुघलांच्या हरममधील महिला यमुना नदीत रात्रीच का आंघोळ करत असत?

सकाळ डिजिटल टीम

मुघलकाळात यमुना स्वच्छ

मुघल सम्राटांच्या काळात आणि ब्रिटिश राजवटीतही यमुना नदी अत्यंत स्वच्छ असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात.

Mughal Harem women

|

esakal

अकबराला नौकाविहाराची आवड

सम्राट अकबराने यमुना नदीत काही नौका ठेवलेल्या होत्या. उन्हाळ्याच्या उष्ण रात्री तो या नौकांवर विश्रांती घेत असे.

Mughal Harem women

|

esakal

जहांगीरकडून परंपरा कायम

अकबरानंतर सम्राट जहांगीरनेही यमुनेशी असलेले नाते कायम ठेवले. नदीवरील नौकाविहार त्यालाही आवडत असे.

Mughal Harem women

|

esakal

शहाजहानलाही नौकाविहाराचा छंद

राजधानी दिल्लीला हलवल्यानंतर शहाजहानलाही यमुना नदीत नौकाविहार करायला आवडत असे.

Mughal Harem women

|

esakal

रात्री राजघराण्यातील स्त्रिया नदीवर

शहाजहानच्या हरममधील उपपत्नी, राजकन्या आणि दासी रात्री लाल किल्ल्यातील नदीकाठच्या दरवाजातून बाहेर पडत असत.

Mughal Harem women

|

esakal

स्त्रियांचा स्नानाचा आनंद

या स्त्रिया रात्री नौकाविहारासोबतच यमुना नदीत स्नानाचाही आनंद घेत असत. त्यांच्या सुरक्षेसाठी किन्नर अंगरक्षक सोबत असत.

Mughal Harem women

|

esakal

सलीमची पोहण्याची स्पर्धा

इतिहासकारांच्या माहितीनुसार, तरुण राजकुमार सलीमने पावसाळ्यात आयोजित पोहण्याच्या वार्षिक स्पर्धेत भाग घेतला होता.

Mughal Harem women

|

esakal

सैय्यद का बागपर्यंत पोहला

सलीमने आग्रा किल्ल्यापासून सैय्यद का बागपर्यंत यमुना नदी पोहून पार केली. नदीच्या प्रवाहाचा सामना करत त्याने पलीकडचा किनारा गाठला.

Mughal Harem women

|

esakal

'उस्ताद-ए-तैराक'पदवी

पलीकडच्या बागेत दिवे प्रज्वलित केल्यानंतर दरबारातील सर्वोत्तम जलतरणपटू मीर मछली याने सलीमला 'उस्ताद-ए-तैराक' म्हणजेच पोहण्यातील निपुण ही पदवी दिली.

Mughal Harem women

|

esakal

रात्री पोहण्याची परंपरा

दिल्लीमध्येही सावन आणि भाद्रपद महिन्यांत मुघलांच्या हरममधील महिला, राजकुमार आणि राजकन्या लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी रात्रीच्या वेळी दूर यमुना नदीत पोहायला जात असत.

Mughal Harem women

|

esakal

मुंबईच्या हृदयात वसलंय २८ घरांचं अनोखं गाव; पाहायला परदेशातून येतात लोक

Khotachiwadi Heritage Village

|

esakal

येथे क्लिक करा