मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहांने चष्मा घालणं का सुरु केलं?

संतोष कानडे

मुमताज महल

मुमताज महलच्या स्मरणार्थ मुघल बादशहा शाहजहांने ताजमहल उभा केला होता. जगातल्या सात आश्चर्यांपैकी तो एक आहे.

शाहजहां

शाहजहां बादशहाचं मुमताजवर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर सम्राटाला कुठेच मन लागत नव्हतं.

मुमताज महल

१७ जून १६३१ रोजी आपल्या चौदाव्या बाळाला जन्म देतेवेळी मुमताज महलचा मृत्यू झाला होता. त्याचा शाहजहावर वाईट परिणाम झाला.

इनायत खान

शाहजहांचे दरबारी इतिहासकार इनायत खान आपल्या 'शाहजहांनामा' या पुस्तकात शाहजहांच्या अवस्थेबद्दल लिहितो.

महल

मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहां खूप दुःखी झाला. संपूर्ण आठवडाभर तो आपल्या महलाच्या बाहेर आला नाही.

दरबार

शाहजहांने दरबारात येणंच सोडून दिलं. विशेष म्हणजे बुधवारी तो पांढरे कपडे नेसत असे. कारण त्याच दिवशी मुमताजचा मृत्यू झाला होता.

प्रकृती

इतिहासकार इनायत खान पुढे लिहितो, शाहजहांच्या प्रकृतीवर एवढा परिणाम झाला की, त्याची दाढी अचानक पांढरी होऊ लागली.

चष्मा

याचमुळे पुढे त्याला डोळ्यांची कमजोरी आली आणि चष्मा घालावा लागला. पुढे हाच चष्मा एक ऐतिहासिक वस्तू बनून राहिला.

लिंगपिसाट मुघल बादशहा, अधिकाऱ्याच्या बायकांनाही सोडलं नाही

येथे क्लिक करा