संतोष कानडे
मुघलांनी कायम महिलांना दुय्यम दर्जाच समजून केवळ एक वापरायची वस्तू म्हणून त्यांच्याकडे बघितलं
हरम हे त्याचं उत्तम उदाहरण, लैंगिक भूक, मौजमजा अन् ऐशोआराम यासाठीच मुघलांची आज ओळख आहे
ज्या मुघल बादशहाकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्या शहाजहांनने तर आपल्या अधिकाऱ्यांच्या बायकांनाही सोडलं नव्हतं
इटालियन प्रवासी मनूची याने याबाबत लिहून ठेवलेलं आहे. शहाजहां आपल्या लैंगिक सुखासाठी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा वापर करीत असे
एवढंच नाही तर आपल्या शारीरिक सुखासाठी तो सतत स्त्रीयांच्या शोधात असे. आवडत्या महिलांसाठी तर तो वाट्टेल ते करीत असे
युरोपियन प्रवाशी बर्नियर यानेही शहाजहांनच्या व्यभिचाराबद्दल लिहिलेलं आहे. त्याचं नाव मुलगी जहाँआरासोबत जोडलं गेलं, मात्र त्याला ठोस ऐतिहासिक पुरावा नाही
इतिहासकार फ्रांसुआ बर्नियरच्या मते शाहजहां आपल्या मुलीवर अत्यंत प्रेम करत होते. हे प्रेम ‘सामान्य’ वागणुकीच्या पलीकडे आहे का, यावर मतभेद आहेत
मनूचीने बर्नियरच्या मतांवर टीका केली. त्याच्या मते असं काही नव्हतं. जहांआराला जहांगिरने साम्राज्याचे अनेक अधिकार देऊ केले होते
काही इतिहासकारांच्या मते तिला तिच्या दर्जाचा पुरुष मिळालाच नाही. काहींच्या मते तिने सत्तेच्या समीकरणासाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
मुघलं आपल्या मुलींचे लग्न करीत नसत, कारण मुलीचं लग्न जर योग्य नात्यात केलं गेलं नाही, तर तिचा पती साम्राज्यावर हक्क सांगू शकतो.