मुघलांमुळे युद्धपद्धतीत कोणते बदल झाले? मराठ्यांना का हरवता आलं नाही?

संतोष कानडे

मुघलांच्या आगमनानंतर युद्धपद्धतीत मोठे बदल!

मुघल भारतात आल्यानंतर युद्धपद्धतीत खूप बदल झाले. पारंपरिक शस्त्रांऐवजी तोफा, दारूगोळा आणि बंदुका वापरल्या जाऊ लागल्या.

पानिपतचे युद्ध आणि दारूगोळ्याचा प्रवेश

१५२६ मध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला. या युद्धात पहिल्यांदाच तोफांचा वापर झाला.

'मिलिटरी स्टाईल' युद्धांची सुरुवात

मुघलांनी घोडेस्वार, तोफखाना आणि सैन्याच्या तुकडी तंत्रावर जास्त भर दिला.

भारतात तोफांचा वाढता वापर

मुघलांच्या काळात हलक्या आणि मध्यम तोफा सहजपणे हलवता येऊ लागल्या.

मोठ्या तोफांसाठी हत्तींचा वापर

भारतीय तोफा जड आणि पितळेच्या बनलेल्या होत्या. याउलट, मुघल हलकी, जलद वापरता येणारी शस्त्रे वापरत असत. मोठ्या तोफा हलवण्यासाठी हत्तींचा वापर केला जाई.

हातातील बंदुका – 'तुफंगस'चा वापर

मुघल सैनिक 'तुफंगस' नावाच्या बंदुका वापरत. यातून अचूक लक्ष्य साधता येत होते.

सैन्याचे संघटन आणि व्यवस्थापन

मुघलांनी प्रत्येक प्रांतात छावण्या (कँटोन्मेंट) उभारल्या. मनसबदारांची नेमणूक केली आणि उत्तम जातीचे घोडे बाहेरून मागवले.

रणनीती – केवळ युद्ध नव्हे, किल्ल्यांना वेढा!

मुघलांनी फक्त थेट युद्धच नाही, तर किल्ल्यांना वेढा घालण्याचे तंत्रही वापरले. त्यांनी चित्तोड, रणथंबोर येथील किल्ल्यांमधील रसद बंद करून विजय मिळवला.

युद्धात मदत करणारे 'नॉन-कॉम्बॅट' योद्धे

पाच हजारांहून अधिक कारागीर, टँकर (पाणीवाहू) आणि सुतार आधीच युद्धक्षेत्रात पाठवले जात असत. हे लोक लढाईत थेट भाग घेत नव्हते, पण खूप महत्त्वाचे होते.

अकबर ते औरंगजेब – मुघल साम्राज्याचा युद्धकाळात विकास

अकबरने आपले साम्राज्य वाढवले. औरंगजेबाने तर २७ वर्षे सतत युद्धात घालवली. मुघल साम्राज्याचा युद्धकाळात खूप विकास झाला.

अजिंक्य मराठे

मात्र मराठ्यांना हरवणे मुघलांना कठीण गेले. 'गनिमी कावा' ही युद्धनीती महाप्रचंड मुघल सेनेला झेपली नाही. त्यामुळे औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाला.

कोमोत्तेजनाासठी मुघल कोणत्या नदीचं पाणी वापरीत?

<strong>येथे क्लिक करा</strong>