सकाळ वृत्तसेवा
मुघलांच्या राज्यकारभाराविषयी आणि खासगी जीवनाविषयी पुत्रगाली व्यापारी मैनरिकने लेख लिहिलेले आहेत.
शहाजहान आपल्या पूर्वजांच्या परंपरेचं पालन करीत आपल्या बेगम आणि रखेलींसोबत भोजन करायचा.
मुघल शासकांना किन्नरद्वारे जेवण दिलं जायचं. जेवण बनवण्यापूर्वी शाही हकीम मेन्यू ठरवायचा.
डच व्यापारी फ्रान्सिस्को पेल्सार्तने आपलं पुस्तक 'जहांगिर्स इंडिया' यामध्ये मुघलांच्या जेवणाविषयी लिहिलेलं आहे.
सोबतच मैनरिकने आपलं पुस्तक 'ट्रॅव्हल्स ऑफ फ्रे सेबेस्टियन मैनरिक'मध्ये मुघलांच्या खाण्याच्या सवयींचा उल्लेख केला आहे.
आपल्या पुस्तकामध्ये त्याने लिहिलं की, मुघलांचं शाही भोजन प्रत्येकदिवशी ठरायचं.
भोजनाची जबाबदारी हकीमावर असायची. ते त्यामध्ये औषधीदेखील मिसळायचे. त्यामुळे मुघलांचं आरोग्य चांगलं रहात असे.
बदलणारं हवामान आणि आरोग्याचा विचार करुन भोजनातले व्यंजणं ठरायचे.
भातावर चांदीचे शिक्के उठवले जात असत. चांदीमुळे जेवण पचण्यास मदत होत असे. यामुळे शारीरिक संबंधांचा वेळ वाढतो, असंही म्हटलं आहे.
याशिवाय गंगा नदीचं पाणी आणि थेट पावसाचं पाणी साठवून ते जेवण बनवण्यासाठी वापरलं जात असे.