महिन्याला दोन कोटी रुपये खर्च करणारी मुघलांची राजकुमारी

संतोष कानडे

मुघल

मुघल बादशहा शाहजहान याची पत्नी मुमताज बेगमची मुलगी त्याकाळी सर्वात सुंदर होती. अनेक लोक तिला एकदा बघण्यासाठी तरसत होते.

शहाजहान

शहाजहानच्या १४ मुलांपैकी एक होती जहांआरा बेगम. शहाजहानची ही सगळ्यात आवडती मुलगी होती.

फ्रेंच इतिहासकार

फ्रेंच इतिहासकार फ्रेंकाई बर्नियर याने आपलं पुस्तक ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर यामध्ये तिच्याविषयी लिहिलं आहे.

प्रेम

पुस्तकात तो लिहितो, शहाजहान आपल्या मुलीवर वेड्यासारखं प्रेम करत होता. जहांआरा ही मुमताजची मोठी मुलगी होती.

सर्वात सुंदर

जहांआरा ही जगातल्या सर्वात सुंदर मुलींपैकी एक होती. १६३१ मध्ये मुमताजचा मृत्यू झाल्यानंतर जहांआरावर अनेक जबाबदाऱ्या आल्या.

मुघल साम्राज्य

शहाजहानने जहांआराला मुघल साम्राज्याची पादशाह बेगम ही पदवी दिली होती. त्याने जाणूनबुजून आपल्या मुलीचं लग्न केलं नाही, असं बर्नियर लिहितो.

दरबारी

''जे झाड बादशहा लावतो त्याची फळ तोडण्याचे पूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहेत'' असं मुघलांचे दरबारी म्हणायचे, असंही बर्नियरने लिहिलं आहे.

आग्रा

जहांआराने आठ वर्षे आग्र्याच्या किल्ल्यातील मुसम्मन बुर्जमध्ये कैद असलेल्या आपल्या वडिलांची मृत्यूपर्यंत सेवा केली.

मुमताज

मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचा अर्धा वाटा शाहजहांनने जहांआराला दिला होता. त्यामुळे ती जगातली सगळ्यात श्रीमंत महिला ठरली होती.

पॉकेटमनी

याशिवाय जहांआराला वर्षाला दोन कोटी रुपये पॉकेटमनी मिळायचा. तसेच तिच्याकडे अनेक जहागिऱ्या होत्या.

चांदणी चौक

जहांआराला बाजारात जाऊन खरेदी करता यावी, यासाठी शाहजहानने चांदणी चौकाची निर्मिती केली होती. त्याचा नकाशासुद्धा जहांआराने तयार केला होता.

प्रियकर

जहांआराचे अनेक प्रियकर होते आणि त्यांना ती चोरुन चोरुन भेटायची, असं म्हटलं जातं. तिला भेटण्यासाठी काही प्रियकर महलात यायचे.

कामवासना वाढवण्यासाठी मुघल बादशहा काय खायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>