संतोष कानडे
मुघल सम्राट शाहजहांला ७ मुलं होती. त्यापैकी तिघाचा मृत्यू झालेला होता. उरलेल्या चौघांसोबत त्याचं वैर होतं.
या चार मुलांचं आणि शाहजहांचं कधीही पटलं नाही. एवढंच नाही तर सिंहासनासाठी त्यांचं शाहजहांसोबत भयंकर युद्ध झालं.
शेवटच्या क्षणी शाहजहांला पुत्रप्रेम मिळालं नाही. मृत्यूनंतर पार्थिवाला खांदा देण्यासाठी किन्नर उभे राहिले.
किन्नर आणि नोकरांनी शाहजहांला खांदा दिला. ते शाही दरबारातून पाठवण्यात आलेले होते.
शाहजहांचा मुलगा औरंगजेबने क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा पार केल्या होत्या. त्याने बापालाच आग्र्याच्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं.
१६५८ ते १६६६ अशी आठ वर्षे नजरकैदेत काढल्यानंतर १६६६ मध्ये शाहजांचा मृत्यू झाला.
या आठ वर्षांमध्ये शाहजहांची काळजी घेतली ती त्याची मुलगी जहांआराने. वाईट काळात तिने आपल्या पित्याची सेवा केली.
जहांआराने राजमहलाचं वैभव आणि सुख त्यागून आपल्या वडिलांच्या सेवेत आठ वर्षे घालवले.