संतोष कानडे
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मुघल बादशहा शाहजहां चष्मा वापरत असे. तोही स्पेशल एडिशन.
शाहजहांच्या चष्म्यामध्ये खास पद्धतीचे रत्न जोडलेले होतो. काचेऐवजी चष्म्यामध्ये हिरे आणि पाचूपासून बनलेले लेन्स लावलेले होते.
सतराव्या शतकातले हे दोन जोडी चष्मे आजही उपलब्ध आहेत. याची किंमत साधारण ३५ लाख डॉलर म्हणजे २५ कोटी रुपये आहे.
केवळ हिरे बसवले म्हणून या चष्म्याची किंमत वाढलेली नाही तर तो एक शाही चष्मा असल्याने तो अनमोल ठरला आहे.
Sotheby's नुसार हा चष्मा मुघल साम्राज्यातल्या राजघराण्यातला आहे. वाईट गोष्टी दूर जाव्यात आणि ज्ञानाच्या उदयापर्यंत पोहोचावं, या उद्देशाने चष्मे बनवण्यात आले होते.
चष्म्यात लावलेल्या लेन्सला Halo of Light म्हणतात. त्याला गोळकोंडात २०० कॅरेटच्या हिऱ्यापासून बनवलेलं आहे.
दुसऱ्या चष्म्याच्या लेन्सची जोडी हिरव्या रंगाची आहे. याला Gate of Paradise म्हटलं जातं.
या चष्म्यावरुन मुघलांच्या श्रीमंतीची जाणीव होते. शाहजहांनंतर इतरही मुघलांनी हे चष्मे वापरल्याचं सांगितलं जातं
जागतिक बाजारांमध्ये हिरे आणि चष्म्यांना मोठी मागणी आहे. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.