Apurva Kulkarni
मुगल काळातल्या स्त्रिया सौंदर्य टिकवण्यासाठी अत्यंत महागडी सौंदर्यप्रसाधने वापरत होत्या.
त्यांचं ब्युटी रुटीन सकाळी हात, पाय आणि चेहरा स्वच्छ धुण्याने सुरू व्हायचं.
स्वच्छतेनंतर चेहऱ्यावर आणि हात-पायांवर विविध प्रकारचे सुवासिक अत्तर लावले जायचे.
दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या काडी आणि एक विशेष पावडर वापरली जात होती.
चेहऱ्याला लावणाऱ्या पावडरमध्ये मोती, तृणमणी, कस्तुरी, कपूर आणि सुगंधी लाकडांचा समावेश असे.
ओठांना रंग देण्यासाठी पानाचा वापर केला जात असे. पान चघळण्याची सवयही त्या काळी होती.
हिरड्यांवर आकर्षक काळी पावडर लावण्याचा प्रयत्न होता, ज्यामुळे सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.
सुरुवातीला त्यांनी मध्य आशियातून आयात केलेल्या सौंदर्य वस्तूंचा वापर केला.
सौंदर्य हा केवळ व्यक्तिमत्त्वाचा भाग नव्हता, तर ते त्यांचे वैभव आणि प्रतिष्ठा दर्शवत असे.