सकाळ डिजिटल टीम
२७ सप्टेंबर १७१९ रोजी रोशन अख्तर दिल्लीचा बादशाह बनला, तेव्हा त्याचे वय केवळ १६ वर्ष होते
१७१९ ते १७४८ या काळात दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेला हा बादशाह युद्धापेक्षा आपल्या आगळ्यावेगळ्या आवडीनिवडींसाठी ओळखला गेला
पुढे हाच तरुण ‘मुहम्मद शाह रंगीला’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. या रंगीला राजाला शायरी, संगीत आणि नृत्याची विशेष आवड होती
चांगली बाब म्हणजे रंगीलाच्या काळात कलाकारांना पुन्हा एकदा समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले.
महिलांची वेशभूषा करण्याची या रंगीलाला अनोखी आवड होती. तो महिलांच्या वेशात दरबारात जायचा.
जेव्हा मराठा सैन्याने दिल्लीवर चढाई केली, तेव्हा रंगीला स्वतः लढण्यासाठी मैदानात उतरला नाही. तो महालात बसून कोंबड्यांच्या झुंजीचा आनंद घेत होता
औरंगजेबाच्या कठोर कायद्यांनंतर, रंगीलाने संगीत, नाट्य आणि शायरी यांसारख्या कलांना पुन्हा एकदा राजदरबारात आणि समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली
राज्यकारभार, युद्धनीती या गोष्टींकडे रंगीलाचं पूर्ण दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्याचं साम्राज्य कमकुवत होत गेलं
त्याच्या अशा वागण्याच्या पद्धतीमुळे त्याला ‘रंगीला’ हे टोपणनाव मिळाले, जे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी तंतोतंत जुळते.