महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पर्यटनाची 5 ठिकाणं कोणती?

संतोष कानडे

लोणावळा

लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुंबई आणि पुण्यापासून हे ठिकाण अत्यंत जवळ आहे.

भुशी डॅम

येथे भुशी डॅम, टायगर पॉईंट, राजमाची किल्ला, कार्ला भाजा लेणी ही ठिकाणं बघता येतात. शनिवार, रविवारी टाळून जावं.

अलिबाग

अलिबाग हा दुसरा उत्तम पर्याय आहे. गेटवे ऑफ इंडियाहून केवळ १००-२०० रुपयांमध्ये अलिबागला पोहोचता येते.

कुलाबा किल्ला

बीच, कुलाबा किल्ला, रेवदंडा बीच आणि नागाव बीच बघण्यासारखं आहे. स्थानिक खानावळी आणि नागाव, आक्षी या गावांमध्ये होमस्टे करता येतो.

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. सर्व शहरांमधून महाबळेश्वरला बस आहेत. येथे एमटीडीसी रिसॉर्ट्स किंवा स्थानिक लॉज स्वस्त पडतात.

वेण्णा लेक

महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक, ऑर्थर सीट, मॅप्रो गार्डन आणि टेबल लँड बघता येतं. तेथे फिरण्यासाठी दुचाकी मिळते.

अजिंठा-वेरुळ

अजिंठा-वेरुळ लेणी नक्की बघाव्या अशाच आहेत. छत्रपती संभाजी नगरहून अजिंठा-वेरुळ लेण्यांसाठी बस उपलब्ध आहेत.

दौलताबाद

छत्रपती संभाजी नगरमध्ये लेण्यांसह बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला, सिद्धार्थ गार्डन बघता येतं. विद्यार्थ्यांना तर लेण्यांच्या प्रवेश शुल्कात सवलत असते.

हरिहरेश्वर

कोकणचा अनुभव घ्यायचा असेल तर हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनला नक्की जा. येथे राहण्यासाठी होमस्टे संस्कृती आहे. त्यामुळे घरगुती जेवण मिळेल.

काळभैरव मंदिर

येथे हरिहरेश्वर मंदिर, काळभैरव मंदिर आणि शांत समुद्रकिनारे अनुभवता येतील. येथे प्रवासासाठी खासगी गाड्यांपेक्षा बसचा वापर करावा.

या हिंदू राजाने बांधली भारतातली पहिली मशीद

<strong>येथे क्लिक करा</strong>