Mayur Ratnaparkhe
मुकेश सहनी हे बिहारच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत.
मुकेश सहनी हेत्यांच्या अनोख्या पार्श्वभूमीमुळे आणि निषाद (मल्लाह) समुदायाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.
विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) चे संस्थापक सहनी यांना "मल्लाहचा पुत्र" म्हणून ओळखले जाते.
पाटणा येथे झालेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले आहे.
दरभंगा जिल्ह्यातील सुपौल बाजारात जन्मलेले सहनी यांचे वडील जितन साहनी हे एक साधे व्यापारी होते.
मुंबईतील एका कॉस्मेटिक स्टोअरमध्ये सेल्समन म्हणून काम करत कारकिर्दीची सुरुवात केली होती.
मुकेश सहनी यांनी पुढे सेट डिझाइनचे क्षेत्र निवडले पाठपुरावा केला आणि मुकेश सिनेवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली.
मुकेश सहनी यांनी शाहरुख खानच्या देवदास आणि सलमान खानच्या बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांसाठी सेट डिझाइन केले आहे.
मुंबईतील यशानंतर, ते सामाजिक कार्याकडे वळले आणि ‘सहनी समाज कल्याण संस्था’ स्थापन केली.
Piles Remedies,
Sakal