हिमालयापेक्षाही प्राचीन! पुण्याच्या 'या' नद्यांना हजारो वर्षांचा इतिहास

Shubham Banubakode

हिमालयापेक्षाही प्राचीन

पुण्यातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांना लाखो वर्षांचा इतिहास आहे. या नद्या सह्याद्री इतक्याच प्राचीन मानल्या जातात.

Mula-Mutha Rivers

|

esakal

अमूल्य देणगी

सुमारे ६० दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधून या नद्यांचा जन्म झाला. त्यांचे अस्तित्व हिमालयापेक्षा जुने मानले जाते.

Mula-Mutha Rivers

|

esakal

'आई मुठा'ची गोष्ट

मुठा नदीचा उगम पश्चिम घाटातील वेगाळे गावाजवळ होतो. पुणेकर तिला प्रेमाने "मुठाई" म्हणतात.

Mula-Mutha Rivers

|

esakal

हिरवीगार वाट

मुळशीतील मुळेश्वर देवराईतून उगम पावणारी मुळा नदी घनदाट जंगलातून प्रवास करत पुण्याकडे येते.

Mula-Mutha Rivers

|

esakal

दोघींचा संगम

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ मुळा आणि मुठा एकत्र येतात. त्यानंतर या नदीला "मुळा-मुठा" म्हणून ओळखले जाते.

Mula-Mutha Rivers

|

esakal

पक्ष्यांचे आवडते ठिकाण

कवडी परिसरात मुळा-मुठा नदीकाठी दरवर्षी अनेक स्थलांतरित पक्षी येतात. एकेकाळी हा परिसर जैवविविधतेने समृद्ध होता.

Mula-Mutha Rivers

|

esakal

वाढते प्रदूषण

शहरातील सांडपाणी आणि प्रदूषणामुळे नदीची अवस्था चिंताजनक झाली आहे. प्रदूषणामुळे येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.

Mula-Mutha Rivers

|

esakal

दंतकथा

दंतकथेनुसार राजा गजानकाच्या शापामुळे दोन अप्सरा मुळा आणि मुठा नद्या बनल्या. भीमा नदीत विलीन झाल्यानंतर त्यांना मोक्ष मिळाला.

Mula-Mutha Rivers

|

esakal

महाराष्ट्रात सासू-सुनेची विहीर कुठंय तुम्हाला माहिती का?

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

हेही वाचा -