महाराष्ट्रात सासू-सुनेची विहीर कुठंय तुम्हाला माहिती का?

Shubham Banubakode

सासू सुनेची विहीर

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे असलेली 'सासू-सुनेची विहीर' इतिहास, श्रद्धा आणि वास्तुकलेचा अनोखा संगम मानली जाते.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र

रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे प्रमुख तीर्थस्थान आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी आणि ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी येतात.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

कुणी बांधली विहीर?

पाण्याची समस्या दूर करण्यासाठी केशव नायक यांनी या विहीरीचं बांधकाम केलं.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

नावामागची कहाणी

एका आख्यायिकेनुसार विहिरीवर येथील सासु सुना नेहमी पाण्याकरिता भांडत असे. हे प्रकरण तेव्हा श्री गोविंद प्रभू यांच्यापर्यंत गेले.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

म्हणून पडलं सासू सुनेचं नाव

त्यांनी त्या दोघींचे भांडण सोडवत विहिरीचे दोन भाग करण्यास सांगितल तेव्हापासून या विहिरीला सासू सुनेची विहीर म्हणून ओळखल्या जाते.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

अनोखी रचना

या विहिरीची रचना ताऱ्यासारखी असून ती पाहणाऱ्यांना थक्क करते. प्राचीन भारतीय वास्तुकलेचा हा उत्कृष्ट नमुना मानला जातो.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

तीन बाजूंनी उतरणाऱ्या पायऱ्या

विहिरीत उतरण्यासाठी तीन दिशांनी पायऱ्या आहेत. एकूण 30 पायऱ्या उतरल्यावर मुख्य चौकोनी विहीर दिसते.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

नऊ ऐतिहासिक विहिरी

सासू-सुनेच्या विहिरीसोबतच मातंग विहीर, राम-लक्ष्मण विहीर, कापूर विहीर आणि उतरंड विहीर अशा एकूण 9 ऐतिहासिक विहिरी येथे आहेत.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

कसे पोहोचाल?

रिद्धपूर हे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारपासून अवघ्या 4 किमी अंतरावर आहे. अमरावतीहून येथे सहज रस्तामार्गे पोहोचता येते.

Sasu Sunechi Vihir in Maharashtra

|

esakal

जगात सर्वाधिक प्रजनन दर कोणत्या देशात?

fertility rate 

|

esakal

हेही वाचा -