kimaya narayan
अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राप्रमाणेच भविष्य जाणून घेण्याची शाखा आहे. याद्वारे व्यक्तीच स्वभाव, व्यक्तिमत्त्वही जाणून घेता येतो.
तुमचा जन्म ज्या तारखेला झाला आहे त्याची बेरीज करून आलेला एक अंकी क्रमांक तुमचा मूलांक असतो. उदाहरणार्थ- कुणाचा जन्म जर 27 तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक 9 आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत परफेक्शनिस्ट असलेल्या मूलांकाविषयी. या मूलांकाच्या व्यक्ती त्यांचं नियोजन आणि कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जातात.
हा मूलांक आहे 4. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4,13 आणि 22 तारखेला झाला असतो त्यांचा मूलांक 4 असतो. या मूलांकाच्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट नियोजन करूनच करतात.
या मूलांकाच्या व्यक्ती सहजपणे सगळ्यांमध्ये मिसळतात पण यांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकत नाही. पण लग्न या व्यक्ती निभावतात.
कौटूंबिक संबंध चांगले असतात पण भावंडांशी पटतेच असं नाही. इतरांसोबत लगेच मैत्री करतात. स्वभाव तापट, स्वार्थी आणि अहंकारी असतो.
यांना त्यांच्या परफेक्शनिस्ट वृत्तीमुळे करिअरमध्ये चांगला फायदा होतो. यशाच्या शिड्या लवकर चढतात आणि परदेशातही चांगली संधी मिळते.
यांचा स्वभाव आत्मकेंद्री, तापट आणि अहंकारी असतो.
हे लोक ट्रान्सपोर्ट, व्यापार, ठेकेदार, राजकारण, डिझायनर, डॉक्टर आणि वकील म्हणून चांगलं करिअर करू शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.