kimaya narayan
ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र ही सुद्धा भविष्य जाणून घेण्याची एक शाखा आहे. अंकशास्त्रानुसार काही मूलांकाच्या तरुणी लग्नानंतर सासरच्या पॉवर क्वीन बनतात. कोणता आहे हा मूलांक जाणून घेऊया.
हा मूलांक आहे 9. ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झाला असतो त्यांचा मूलांक 9 असतो. अतिशय महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व या मुलींचं असतं.
या मूलांकाच्या मुळीच सासूशी बऱ्याचदा पटत नाही. त्यांच्या सडेतोड स्वभावामुळे बऱ्याचदा दोघींचे खटके उडू शकतात.
मूलांक 9 च्या लोकांना वर्चस्व गाजवायला आवडतं. याशिवाय त्यांच्यात उत्तम नेतृत्वक्षमता असते. त्यामुळे स्वतःच्या अटींवर या जीवन जगतात.
लग्नानंतर या घराची जबाबदारी एकहाती सांभाळतात. त्यामुळे बऱ्याचदा सासरचे लोक यांना घाबरून असतात.
या मुलींशी लग्न केल्यानंतर नवऱ्याचं नशीब बदलतं. नवऱ्यासाठी या लकी ठरतात आणि त्याच्या प्रत्येक अडचणीत त्या त्याची साथ देतात. यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांच्या पतीला यश मिळतं.
या मूलांकाच्या मुली घरात स्वतःची मनमानी करतात. त्यामुळे यांचा निर्णय घरात बऱ्याचदा अंतिम ठरतो.
जरी वर्चस्ववादी वृत्ती असली तरीही या मुली घराला जोडून ठेवतात आणि सगळ्यांना सांभाळून घेतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.