Anushka Tapshalkar
बेसन पीठ व मुलतानी माती हे त्वचेसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित घटक आहेत.
दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर असून वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असतात.
बेसन पीठ मृत त्वचा काढून टाकते, तर मुलतानी माती खोलवर स्वच्छ करते.
बेसन पीठ त्वचा मऊ ठेवते, पण मुलतानी माती कोरडेपणा निर्माण करू शकते.
मुलतानी माती अतिरिक्त तेल शोषून घेते, ज्यामुळे तेलकट त्वचेसाठी उत्तम आहे.
मुलतानी माती त्वचेला ताजेतवाने करते, तर बेसन पीठ डाग कमी करून नैसर्गिक चमक देते.
मुलतानी माती सीबम (Sebum) नियंत्रित करून मुरुमांची समस्या कमी करते.
बेसन पीठ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगले आहे, तर मुलतानी माती तेलकट व मुरुमयुक्त त्वचेसाठी योग्य आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.