सकाळ डिजिटल टीम
इंडियन प्रिमिअर लीग सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. २२ मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू होणार आहे.
सर्व संघानी आपल्या प्रॅक्टिस कॅम्पला सुरूवात केली आहे.
त्याचबरोबर प्रत्येक संघाच्या सोशल मीडिया हॅंडलवरून प्रमोशनल व्हिडीओज देखील पाहायला मिळत आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आल्यानंतर आता रोहित शर्मा व हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात परतणार आहेत.
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हॅंडलवरून संघातील प्रमुख खेळाडूंचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
ज्यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव व तिलक वर्मा हे मुंबईने संघात रिटेन केलेले खेळाडू पाहायला मिळत आहेत.
जे कोणत्या तरी नवीन खेळाडूच्या स्वागताची तयारी करताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.