संतोष कानडे
मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात मोठं बजेट असलेली श्रीमंत संस्था आहे.
२०१७पूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवकांना केवळ १० हजार रुपये मानधन मिळे.
परंतु त्यानंतर वाढलेल्या महागाईमुळे तब्बल २५ हजार रुपये मानधन करण्यात आले.
याशिवाय पालिकेच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी नगरसेवकांना वेगळा भत्ता मिळतो.
तसेच मनपात रेग्युलर जाण्यासाठी प्रवास भत्ता, मोबाईल बिल, बेस्टचा मोफत पास आणि नगरसेवांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा मिळतात.
मात्र वरील सर्व बाबी किरकोळ आहेत. कारण प्रभागाच्या विकासकामांसाठी नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असतो.
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना वर्षकाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळतो. यातून रस्ते, वीज, पाणीअसे मुलभूत प्रश्न सोडवले जातात.
महानगरपालिकेच्या विविध समित्या असतात. त्या समित्यांवर निवडलेल्या अध्यक्षांना अतिरिक्त सोयी-सुविधा मिळतात.
मुंबईचा नगरसेवक एखाद्या आमदारापेक्षा कमी नसतो, असं म्हणतात. त्याचं कारण मोठ्या प्रमाणावर मिळणारा निधी