Vinod Dengale
मुंबईत घर महागल्याने शहराबाहेर राहणाऱ्या अनेकांना रोज नोकरीसाठी तासन्तास प्रवास करावा लागतो.
daily travel
eSakal
बदलापूर ते गोरेगाव रोज प्रवास करणाऱ्या एका मुंबईकराची Reddit पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Viral Post
eSakal
हा व्यक्ती सकाळी 5 वाजता उठतो आणि 7.15 ची लोकल पकडण्यासाठी 6.30 वाजता घराबाहेर पडतो.
Day Start
eSakal
बदलापूरहून दादर आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेने गोरेगाव असा प्रवास करत तो ऑफिसला पोहोचतो.
Travelling
eSakal
गोरेगावला पोहोचल्यानंतर शेअर रिक्षासाठी तब्बल 30 मिनिटे रांगेत उभं राहावं लागतं आणि अखेर सकाळी 10 वाजता ऑफिस गाठतो.
office
eSakal
ऑफिस सुटल्यानंतर पुन्हा हाच प्रवास सुरू होतो आणि घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे 11 वाजतात.
Return Home
eSakal
“आयुष्य फक्त प्रवास आणि ऑफिसमध्ये संपतंय; रात्री मी फक्त झोपण्यासाठी घरी जातो,” अशी व्यथा त्याने पोस्टमध्ये मांडली.
Sleep
eSakal
या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रवासाच्या अशाच अनुभवांच्या प्रतिक्रिया दिल्या असून, मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती आणि रोजच्या प्रवासाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
Emotional
eSakal
ही स्टोरी Redditवरील सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. पोस्टमधील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी सकाळ ने केलेली नाही.
Disclaimer
eSakal
She Covered Girls in Honey and Left Them for Ants! The Queen’s Cruel Secret
eSakal