Sandip Kapde
छत्रपती संभाजी महाराज ४० हजार पागोड्यांत मुंबई विकत घेणार होते, ऐकायला अविश्वसनीय, पण इतिहासातला हा थरारक किस्सा आहे.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
फेब्रुवारी १६८३ च्या आधी महागिरीजवळ संभाजी महाराजांच्या आरमाराची इंग्रज जहाज ‘प्रेसिडेंट’शी झटापट झाली आणि मराठ्यांची तीन गलबते बुडाली.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
या चकमकीनंतर इंग्रजांनी मागितलेले फर्मान व कागद संभाजी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने मुद्दाम लांबवले.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
दरम्यान त्यांनी गोव्यावर हल्ला चढवला आणि माहीम, केळवा, दंतोरा, सारगाव, सुपारा अशी ठाणी घेतली, यामुळे मुंबईकरांमध्ये भीती पसरली.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
मराठ्यांनी मुंबईजवळच्या कारंजा बंदराचा ताबा घेतल्यावर इंग्रजांचा धीर पूर्ण खचला.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
१६८३ च्या अखेरीस संभाजी महाराजांच्या फौजा मुंबईजवळ येऊन तिला घेरून बसल्या.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
मुंबईत अन्नटंचाई एवढी वाढली की लोकांना स्वतःच्या जगण्याचीही शाश्वती राहिली नाही.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
कारंजा मराठ्यांच्या ताब्यात गेल्याने मुंबईकर घाबरले आणि त्यांनी सुरतकरांचा सल्ला मागितला.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
मुंबईतील रहिवाशांनी चाइल्ड आणि वॉर्ड यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून बंड पुकारले.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
ईस्ट इंडिया कंपनीने या गोंधळात रिचर्ड केगविनला मुंबईचा गव्हर्नर बनवले.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
केगविनने संभाजी महाराजांशी थेट मैत्री केली आणि मुंबईचे रक्षण स्वतःकडे घेतले.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
त्यामुळे वॉर्डने सुरतला लिहून दिले की लोक त्यांच्यावर चिडले आहेत आणि केगविन मुंबई ४०,००० पागोड्यांना संभाजी महाराजंना विकणार आहे.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
याच काळात सिद्दी मराठ्यांच्या प्रदेशातून मुले पळवून मुंबईत विकू लागला.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
हा उपद्रव इंग्रजांनी थांबवावा, असे संभाजी महाराजांनी कडक फर्मान काढले.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
कारंजा मराठ्यांच्या ताब्यात गेल्यानंतर इंग्रजांना संभाजी महाराजांसोबत मैत्रीची खरी गरज जाणवू लागली.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
पण सुरतकर इंग्रजांनी नेहमीसारखे उडवाउडवीचीच उत्तरे दिली, “समुद्राचे मालक कोण? घाबरू नका.”
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
२६ एप्रिल १६८४ ला केगविनने कॅ. गॅरीला संभाजी महाराजांकडे तहासाठी पाठवले.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
गॅरी, थॉमस विल्किन्स आणि राम शेणवी हे प्रतिनिधी बिरवाडीत महाराजांना भेटले.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
संभाजी महाराज म्हणाले, सिद्दीला आश्रय देऊ नका, त्याला साहित्य पुरवू नका, आणि मैत्री निष्ठेने पाळा.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
“तुमचा मित्र आमचा मित्र, तुमचा शत्रू आमचा शत्रू”, या अटीवर त्यांनी मैत्री मान्य केली.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
आणि अशी इंग्रज–मराठा तहाची रूपरेषा ठरली… मुंबईच्या इतिहासाला वळण देणारी.
chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
Shivaji Maharaj
esakal