रेल्वे रुळांवर डावीकडे जावे की उजवीकडे? हे लोको पायलटला कसं कळतं? जाणून घ्या...

Mansi Khambe

भारतीय रेल्वे

दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात, पण रुळांचे जाळे पाहून अनेकदा प्रश्न पडतो: चालकाला उजवीकडे जायचे की डावीकडे, हे कसे कळते?

Railway signaling system

|

ESakal

मार्ग

कार किंवा बसप्रमाणे ट्रेनला मार्ग बदलण्यासाठी फिरवता येणारे स्टेअरिंग व्हील नसते. त्यामुळे लोको पायलट गोंधळ न होता ट्रेनला योग्य रुळावर कसे चालवतात?

Railway signaling system

|

ESakal

ट्रॅक तंत्रज्ञान

यामध्ये अत्यंत अचूक सिग्नलचे जाळे, नियंत्रण कक्षातील समन्वय आणि प्रगत ट्रॅक तंत्रज्ञान यांची भूमिका असते.

Railway signaling system

|

ESakal

प्रमुख घटक

लोको पायलट गाड्यांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी तीन प्रमुख घटकांचा एकत्रितपणे वापर करतात: उन्नत रेल्वे सिग्नल, ट्रॅक स्विच आणि पूर्वनिश्चित वेळापत्रक.

Railway signaling system

|

ESakal

सुरक्षित

जेव्हा ट्रेन स्टेशन किंवा यार्डमधून निघते, तेव्हा रुळांजवळ लावलेले सिग्नल चालकाला पुढील मार्ग पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही हे कळवतात.

Railway signaling system

|

ESakal

रुळ

या सिग्नलच्या आधारे, लोको पायलटला रुळ बदलून पुढे जाण्याची परवानगी दिली जाते. ट्रेन तिच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी कोणता मार्ग घेईल, हे केवळ चालकच ठरवत नाही.

Railway signaling system

|

ESakal

ट्रेन

ट्रेन चालक नेहमी एका काटेकोर वेळापत्रकाचे पालन करतात. जे त्यांना अगोदरच सांगते की कोणते मार्ग घ्यायचे आणि ट्रेन कुठे थांबवायची. हा संपूर्ण मार्ग, ट्रेन सध्या ज्या उपविभागातून जात आहे.

Railway signaling system

|

ESakal

रेल्वे नियंत्रण कक्ष

त्या उपविभागाच्या रेल्वे नियंत्रण कक्षाद्वारे निर्धारित केला जातो. या वेळापत्रकाच्या आधारे, नियंत्रण कक्ष पुढील मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवतो.

Railway signaling system

|

ESakal

होम सिग्नल

ट्रेन चालवताना लोको पायलटला कोणता ट्रॅक घ्यायचा आणि कुठून वळायचे याबद्दल सर्वात अचूक आणि अंतिम माहिती मिळते. होम सिग्नलच्या माध्यमातूनच ड्रायव्हर कोणता ट्रॅक घ्यायचा हे ठरवतो.

Railway signaling system

|

ESakal

वेग

हा सिग्नल ट्रेनचा वेग नियंत्रित करण्यात आणि स्थानकांवर नियोजित थांबे राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याशिवाय, लोको पायलटला रुळांच्या जाळ्यातून योग्य मार्ग निवडणे अशक्य होईल.

Railway signaling system

|

ESakal

रचना आणि स्थान

होम सिग्नलची रचना आणि स्थान अतिशय विशिष्ट असते. रेल्वे नियमांनुसार, हा होम सिग्नल, एकच रेल्वे मार्ग दोन किंवा अधिक मार्गांमध्ये विभागला जातो त्या बिंदूच्या ३०० मीटर आधी लावला जातो.

Railway signaling system

|

ESakal

प्रवेश

हे अंतर अशासाठी ठेवले आहे की, वेगवान ट्रेनचा चालक दुरूनच येणारा मार्ग ओळखू शकेल. हा सिग्नल केवळ योग्य मार्गच दर्शवत नाहीतर ट्रेनला स्टेशनमध्ये सुरक्षितपणे प्रवेश करण्यासही मदत करतो.

Railway signaling system

|

ESakal

झोप

प्रवासादरम्यान मुख्य लोको पायलटला कधीही झोप किंवा थकवा जाणवल्यास, इंजिनवरील सहाय्यक लोको पायलटला तात्काळ सावध केले जाते.

Railway signaling system

|

ESakal

लोको पायलट

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका निर्माण झाल्यास, तो मुख्य लोको पायलटला त्वरित जागे करतो. एवढेच नाही तर, जर मुख्य लोको पायलट अचानक आजारी पडला.

Railway signaling system

|

ESakal

सूत्रे

तर सहाय्यक पायलट वेळ न घालवता ट्रेनची संपूर्ण सूत्रे हाती घेतो आणि ट्रेनला सुरक्षितपणे पुढच्या स्टेशनवर घेऊन जातो, जिथे नवीन ड्रायव्हरची व्यवस्था केलेली असते.

Railway signaling system

|

ESakal

अर्ध्या रात्रीही उजेड! 6 महिने सूर्य न मावळणारा देश, लोक कसे जगतात? वाचा...

Norway

|

ESakal

येथे क्लिक करा