मुंबईत पहिली लोकल ट्रेन कधी सुरू झाली?

सकाळ डिजिटल टीम

लोकल ट्रेन

मुंबइकरांच्या दिवसाची सुरूवात ज्या लोकल ट्रेन ने होते ती कधी सुरू झाली काय आहे तीचा इतिहास जाणून घ्या.

Mumbai local train

|

sakal 

ऐतिहासिक सुरुवात

मुंबईत सर्वात पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासातील 'जन्मदिन' मानला जातो.

Mumbai local train

|

sakal 

मार्गाची लांबी

पहिली ट्रेन बोरीबंदर (Bori Bunder) ते ठाणे (Thane) या ३४ किलोमीटर (२१ मैल) अंतरावर धावली.

Mumbai local train

|

sakal 

आशियातील पहिली

ही रेल्वे केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे असल्याचे म्हंटले जाते.

Mumbai local train

|

sakal 

इंजिनांची नावे

पहिल्या रेल्वेला 'साहिब', 'सिंध' आणि 'सुलतान' या तीन वाफेच्या (Steam) इंजिनांनी खेचले होते.

Mumbai local train

|

sakal 

प्रवासाचा वेळ

पहिल्या प्रवासाला सुमारे १ तास १५ मिनिटे लागली, ज्यामध्ये सायन येथे पाण्यासाठी थांबा घेण्यात आला होता.

Mumbai local train

|

sakal 

प्रवाशांची संख्या

या पहिल्या रेल्वेत १४ डबे होते, ज्यात अंदाजे ४०० लोकांनी प्रवास केला होता. ठाण्यापर्यंत मार्ग विस्तारताना १८५४ मध्ये ठाणे खाडीवर भारतातील पहिला रेल्वे पूल बांधण्यात आला.

Mumbai local train

|

sakal 

विद्युत युग

वाफेच्या इंजिनाच्या अनेक वर्षांनंतर, पहिली विजेवर चालणारी (Electric Multiple Unit - EMU) लोकल ३ फेब्रुवारी १९२५ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली.

Mumbai local train

|

sakal 

मुंबईची जीवनवाहिनी

आज मुंबई लोकलचे जाळे ४०० किमी पेक्षा जास्त असून, दररोज ७५ लाखांहून अधिक लोक यातून प्रवास करतात, ज्यामुळे ती 'मुंबईची जीवनवाहिनी' म्हणून ओळखली जाते.

Mumbai local train

|

sakal 

130 वर्षांपूर्वी अमेरिका अन् भारत कसे होते? 10 ऐतिहासिक छायाचित्रे पाहून आश्चर्यचकित व्हाल..!

esakal

येथे क्लिक करा