चर्च अन् समोर सुंदर समुद्र! मुंबईजवळचा हा बीच पाहिलात का? गोवाही विसराल

Mansi Khambe

मुंबईतील समुद्रकिनारे

मुंबईतील जुहू चौपाटी, मरीन लाइन्स, दादर चौपाटी अशा काही नावाजलेल्या समुद्रकिनाऱ्यांना नक्कीच भेट दिली असेल. पण मुंबईसारख्या शहरात निसर्गाच्या सानिध्यात असे एक लपलेले बीच आहे, जे चक्क गोव्याला असल्याची अनुभूती देते.

Velankanni Beach

|

ESakal

मिनी गोवा

मीरा-भायंदर (पश्चिम) जवळील उत्तनमध्ये वेलंकन्नी बीच आहे, ज्याला 'मिनी गोवा' म्हणून ओळखले जाते. शहराच्या धावपळीतून सुटका मिळवण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे.

Velankanni Beach

|

ESakal

अवर लेडी ऑफ वेलंकन्नी

'अवर लेडी ऑफ वेलंकन्नी' यांचे हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या चर्चला आता नवीन रूप देण्यात आले आहे. स्वच्छ समुद्रकिनारा आणि शांत वातावरण असणाऱ्या या ठिकाणाला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्रपरिवारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता.

Velankanni Beach

|

ESakal

वेलंकन्नी बीच

डोंगरी येथील उत्तन गावाजवळ वसलेला वेलंकन्नी बीच वीकेंड गेटअवेसाठी उत्तम लोकेशन आहे.

Velankanni Beach

|

ESakal

कसे जाणार?

भाईंदर रेल्वे स्थानकावरून रिक्षाने उत्तन नका येथे जा. त्यांनतर तेथून पुन्हा (प्रत्येक व्यक्ती) १० रुपये शेअरींग रिक्षा करून किंवा चालत १५ मिनिटांच्या अंतरावर वेलंकनी बीच येथे पोहोचा. याव्यतिरिक्त दुचाकीने प्रवास केल्यास गावातील वातावरणाचा अनुभव घेता येईल.

Velankanni Beach

|

ESakal

शांत वातावरण

मुंबईतील जुहू किंवा दादरसारख्या मोठ्या शहरातील समुद्रकिनाऱ्यांपेक्षा याठिकाणी खूपच कमी गर्दी दिसून येते.

Velankanni Beach

|

ESakal

विविध उपक्रम

येथे पोहणे, सनबाथिंग आणि वॉटर स्पोर्ट्स यांसारख्या विविध उपक्रमांचा आनंद घेता येतो. नयनरम्य दृश्ये, शांत पाणी आणि सुंदर परिसरामुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांना एक अनोखा अनुभव देतो.

Velankanni Beach

|

ESakal

सर्वोत्तम काळ

वेलंकन्नी बीचला भेट देण्यासाठी हिवाळ्याचे महिने, म्हणजेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आहे.

Velankanni Beach

|

ESakal

लोकप्रिय समुद्रकिनारे

जुहू बीच, गिरगाव चौपाटी, वर्सोवा बीच, आक्सा बीच, गोराई आणि मनोरी समुद्रकिनारे, मार्वे बीच हे मुंबईतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत.

Velankanni Beach

|

ESakal

EPFOने बदलले PFचे ८ नियम, पैसे काढण्यापासून ते नॉमिनेशन आणि क्लेमबाबत मोठे अपडेट्स

EPFO

|

ESakal

येथे क्लिक करा