IPL 2027: हार्दिक पांड्याची हकालपट्टी? मुंबई इंडियन्स कोणाला रिलीज करणार?

Pranali Kodre

MI ची कामगिरी घसरली

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, असे अनेक अनुभवी अन् दिग्गज खेळाडू असतानाही मुंबई इंडियन्सची कामगिरी आयपीएल २०२६ मध्ये घसरली.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

९ वा क्रमांक

त्यांनी आयपीएल २०२६ स्पर्धा १४ सामन्यांत ४ विजय आणि १० पराभव स्वीकारात ९ व्या क्रमांकावर संपवली.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

प्रबळ दावेदार होते, पण...

खरंतर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्वात तगडा आणि प्रबळ दावेदार म्हणून मुंबईकडे पाहिलं जात होतं; पण प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली आणि परिस्थिती पूर्णच वेगळी दिसली.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

फलंदाजीत फार खास कामगिरी नाही

रोहित शर्मा, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, डी कॉक यांनी अधून मधून फलंदाजीत तडका लावला, पण म्हणावं तसं कोणीच चाललं नाही.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

गोलंदाजीही सुमार

गोलंदाजीत, त्याहून सुमार कामगिरी झाली. जसप्रीत बुमराह- ट्रेंट बोल्टची जोडी अपयशी ठरलेली असताना बाकी गोलंदाजही फार काही करू शकले नाहीत.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

मोठे बदल होणार?

आता या कामगिरीनंतर मुंबई संघ पुढच्यावर्षी मोठे बदल करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

हार्दिक पांड्या निशाण्यावर

त्यातही सर्वात आधी निशाण्यावर कर्णधार हार्दिक पांड्या आहे. तो पुढच्यावर्षी कर्णधार म्हणून कायम राहण्याची शक्यताही कमी असल्याचं म्हटलं जात आहे.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

सूर्यकुमार यादवच्याही जागेवर प्रश्न

याशिवाय सूर्यकुमारचा घसरलेला फॉर्म पाहाता तोही पुढच्या हंगामात कायम राहिलच याची आता शाश्वती नाही.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

हे दिग्गज होणार रिलीज?

याशिवाय ट्रेंट बोल्ट, डी कॉक, दीपक चाहर, शेरफेन रुदरफोर्ड या खेळाडूंनाही २०२७ साठी मुंबई कायम करण्याची शक्यता कमी आहे.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

रिलीज होण्याची टांगती तलवार

इतकेच नाही तर रॉबिन मिन्झ, राज अंगद बावा, दानिश मालेवार, क्रिस भगत, मयक मार्कंडे, अश्वनी कुमार यांसारख्या खेळाडूंवरही रिलीज होण्याची टांगती तलवार आहे.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

फ्रँचायझीची ओळख

पण मुंबई इंडियन्स ही फ्रँचायझी फारसे बदल करण्यासाठी ओळखली जात नाही.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

कोण होईल संघात कायम?

त्यामुळे काही खेळाडूंवर अजूनही ते विश्वास ठेवून त्यांना कायम करू शकतात, ज्यात रोहित, बुमराह तिलकसह सँटेनर, कॉर्बिन बॉश, रिकल्टन, विल जॅक्स, नमन धीर, गझनफर, शार्दुल ठाकूर अशा काही खेळाडूंची नावं आहेत.

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

IPL: किंग vs प्रिन्स! प्लेऑफमध्ये कोहली की गिल, कोणाची कामगिरी भारी?

Virat Kohli vs Shubman Gill in IPL Playoffs

|

Sakal

येथे क्लिक करा