Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २९ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झाला.
MI vs KKR
Sakal
हा सामना मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत खास असणार असून आजपर्यंत फ्रँचायझी क्रिकेटमध्ये कोणी केलं नाही, तो विक्रम त्यांनी केला आहे.
Mumbai Indians | IPL 2026
Sakal
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना ३०० वा टी२० सामना आहे.
Mumbai Indians | IPL
Sakal
त्यामुळे मुंबई इंडियन्स ३०० टी२० सामने खेळणारा पहिला फ्रँचायझी संघ आहे. यापूर्वी कोणत्याही फ्रँचायझी संघाने ३०० टी२० सामने खेळलेले नाहीत.
Mumbai Indians | IPL
Sakal
याशिवाय ३०० टी२० सामने खेळणारा मुंबई इंडियन्स जगातील एकूण तिसरा संघ आहे.
Mumbai Indians | IPL
Sakal
यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ आणि सोमरसेट या संघांनी ३०० हून अधिक सामने खेळले आहेत. २९ मार्च २०२६ पर्यंत पाकिस्तान आणि सोमरसेट या दोन्ही संघांनी प्रत्येकी ३०३ सामने खेळले आहेत.
Pakistan Cricket Team
Sakal
सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या आयपीएलमधील संघांमध्ये मुंबई इंडियन्स पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहेत. त्यांनी २८७ सामने खेळले आहेत. (२९ मार्च २०२६ पर्यंत)
RCB
Sakal
त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (२८१ सामने) आणि चेन्नई सुपर किंग्स (२७७ सामने) आहेत.
CSK & KKR
Sakal
MS Dhoni | IPL 2026
Sakal