IPL च्या इतिहासात 'हा' पराक्रम करणारा मुंबई इंडियन्स पहिलाच संघ

प्रणाली कोद्रे

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 स्पर्धेतील 14 वा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.

Riyan Parag - Hardik Pandya | Sakal

मुंबईची विक्रमाला गवसणी

पण असे असले तरी या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Mumbai Indians | Sakal

मुंबईचे आयपीएल सामने

मुंबई इंडियन्ससाठी हा आयपीएल इतिहासातील 250 वा सामना होता.

Mumbai Indians | Sakal

मुंबईचे 250 आयपीएल सामने

त्यामुळे आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. मुंबईने 250 पैकी 140 सामने जिंकले आहेत, तर 110 सामने पराभूत झाले आहेत.

Mumbai Indians | Sakal

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

1 एप्रिल 2024 पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्सपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आहे. बेंगळुरूने 244 सामने खेळले आहेत.

RCB | X/IPL

दिल्ली कॅपिटल्स

तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी आयपीएलमध्ये 241 सामने 1 एप्रिल 2024 पर्यंत खेळले आहेत.

Delhi Capitals | X/IPL

कोलकाता नाईट रायडर्स

चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 1 एप्रिल 2024 पर्यंत आयपीएलमध्ये 239 सामने खेळले आहेत.

Kolkata Knight Riders | X/IPL

पंजाब किंग्स

पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्स असून त्यांनी 1 एप्रिल 2024 पर्यंत 235 आयपीएल सामने खेळले आहेत.

Punjab Kings | X/IPL

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्स संघ या यादीत सहाव्या क्रमांकावर असून त्यांनी 1 एप्रिल 2024 पर्यंत 228 आयपीएल सामने खेळले आहेत.

Chennai Super Kings | X/IPL

विराटच्या धावांची बरोबरी, तरीही रियान परागला ऑरेंज कॅप का?

Riyan Parag - Virat Kohli | IPL 2024 | Sakal