Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या सुरू असून गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
मात्र, गुजराज टायटन्सकडून खेळणाऱ्या राशिद खानसाठी मात्र हा हंगाम फारसा खास ठरलेला नाही.
त्याने साखळी फेरीतील १४ सामन्यांत खेळताना ९ विकेट्सच घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या गोलंदाजीवर एकूण ३१ षटकार मारण्यात आले आहेत.
त्यामुळे एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता त्याने मोहम्मद सिराजची बरोबरी केली आहे.
सिराजने २०२२ मध्ये १५ सामन्यांत ३१ षटकार खाल्ले होते.
पण, आता राशिदला गुजरातकडून प्लेऑफमध्येही खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्या गोलंदाजीवर आणखी एक जरी षटकार मारला गेला, तर तो सिराजला मागे टाकून एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज ठरेल.
सध्या या यादीत सिराज आणि राशिद यांच्यापाठोपाठ युजवेंद्र चहल आणि वनिंदू हसरंगा आहेत. चहलच्या गोलंदाजीवर २०२४ मध्ये ३० षटकार मारण्यात आले होते. हसरंगाच्या गोलंदाजीवर २०२२ मध्ये ३० षटकार मारण्यात आले होते.
त्यानंतर ड्वेन ब्रावो असून २०१८ मध्ये त्याच्या गोलंदाजीवर २९ षटकार मारण्यात आले होते.