Mansi Khambe
कोकणवासी गणेशोत्सव आणि होळी सारख्या विविध सणांसाठी मुंबईला प्रवास करतात. त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सिंधुदुर्ग अशी रो-रो सेवा सुरू केली आहे.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
आतापर्यंत मुंबईहून रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी १० ते १२ तास लागत होते, परंतु ही फेरी सुरू झाल्यानंतर आता ३ ते ५ किंवा ५.५ तास लागतील. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
सागरी महामंडळाने मुंबई ते कोकण यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
ही सेवा पूर्वी गणेश चतुर्थीला सुरू होणार होती, परंतु खराब हवामानामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता ती नवरात्रोत्सवनिमित्त सुरू होईल.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
या फेरीत ५५२ प्रवासी (इकोनॉमी), ४४ (प्रीमियम इकोनॉमी), ४८ (बिझनेस), १२ (फर्स्ट क्लास) इतकी आसन क्षमता असून या व्यतिरिक्त ५० चारचाकी आणि ३० दुचाकी देखील त्यात बसू शकतात.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गावर रो-रो सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. वेग, प्रवासी क्षमता व सुरक्षा तपासणी समाधानकारक ठरली असून, सागरी सुरक्षा यंत्रणांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
सकाळ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये तिकीटाची किंमत इकोनॉमी२,५०० रूपये, प्रीमियम इकोनॉमी ४,००० रु. , बिझनेस ७,५०० रु., आणि फर्स्ट क्लास ९००० रुपये असणार आहे.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
यामुळे मुंबई-कोकण रोरो फेरीसेवा कोकणवासीयांच्या खरंच फायद्याची ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
३० वर्षांच्या कालावधीनंतर कोकण प्रदेशात रो-रो फेरी सेवा पुन्हा सुरू होत आहे. या प्रकल्पाला १४७ मंजुरी मिळाल्या आहेत, ज्यामध्ये जहाजबांधणी महासंचालक आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट सारख्या संस्थांकडून परवानगी समाविष्ट आहे.
Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service
ESakal
Wi-Fi
ESakal