सकाळ वृत्तसेवा
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भीषण दहशतवादी हल्ला. यात 28 मृत्यू, 20 नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली आहे.
आतंकवाद्यांनी पर्यटकांचे आधी नाव विचारले, मग कलमा म्हणायला लावला आणि मग गोळ्या झाडल्या.
CRPF जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यावेळी 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
हा हल्ला इतका जबरदस्त होता की सीआरपीएफच्या बसचे तुकडे झाले. देशभरात संतापाची लाट उसळली होती.
दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसखोरी केली होती. CST स्टेशन, ताज हॉटेल, ओबेरॉयवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 160+ मृत, 200+ लोक जखमी झाले होते.
10 दहशतवादी भारतात शिरले होते, त्यातले 9 ठार झाले आणि अजमल कसाब जिवंत पकडला गेला, नंतर त्याला फाशी दिली गेली होती.
मृतांच्या संख्येनुसार – 26/11 सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा आणि पहलगाम देखील तितकेच गंभीर दहशतवादी हल्ले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.