सकाळ वृत्तसेवा
प्यू रिसर्चच्या अहवालात धर्म सोडणाऱ्यांची आकडेवारी जाहीर झाली आहे.
भारतासारख्या देशात धर्माच्या नावावर वाद नेहमीच पेटतो. पण आता धर्मांतर ही फक्त भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाची समस्या बनली आहे.
36 देशांतील 80,000 लोकांवर सर्वे करण्यात आला आहे. प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्ती आपला जन्मधर्म सोडत आहे. खासकरून ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचं मोठं नुकसान होत आहे.
बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मातील लोक धर्म सोडण्यात आघाडीवर आहेत. बऱ्याच जणांनी नवा धर्म स्वीकारला नाही, तर थेट नास्तिक झाले.
भारत व बांगलादेशात हिंदूंचं धर्मांतर अत्यंत कमी आहे. मात्र अमेरिकेत भारतातून गेलेल्या 18% हिंदूंनी धर्म बदलला आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला किंवा नास्तिक झाले.
श्रीलंकेत 11% हिंदू ख्रिश्चन झाले आहेत. दक्षिण कोरियात तब्बल 50% लोकांनी धर्म सोडला आहे.
कॅनडा – 29%, ब्रिटन – 28%, फ्रान्स – 28%, अमेरिका – 22%, नेदरलँड – 30%, स्वीडन – 30%.
हिंदू आणि मुस्लिम समाजात धर्म बदलण्याचं प्रमाण कमी आहे. हे दोन्ही समुदाय जन्मधर्माशी अधिक जोडलेले दिसतात.
काही देशांमध्ये धार्मिक आस्था कमी होत चालली आहे. 'धर्म सोडणं' ही वैयक्तिक बाब आहे.