मुंबई पुणे एक्सप्रेस वेची वाहतूक कोंडी विमानातून दिसतेय भीषण; अन्नपाण्यावाचून अडकलेत लोक, अनेक किमी रांगा

सूरज यादव

टँकरचा अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रोपिलीन या ज्वलनशील वायूने भरलेला टँकर अचानक उलटला.

mumbai pune expressway traffic update

मुंबई लेन बंद

टँकर उलटल्यानंतर त्यातून वायुगळती सुरू झालीय. खबरदारी म्हणून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका बंद करण्यात आलीय.

mumbai pune expressway traffic update

लोणावळ्यापर्यंत ट्राफिक

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ब्लॉक घेत वाहने राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी मार्गान वळविली.

mumbai pune expressway traffic update

प्रवासी अडकले

वाहतूक वळवल्यानं जुन्या महामार्गावरही कोंडी झाली. तासनतास वाहतूक कोंडीत प्रवाशी अन्नपाण्यावाचून अडकून पडले आहेत.

mumbai pune expressway traffic update

१० ते १५ किमी रांगा

पुणे लेनची बाजू खालापूर टोल प्लाझापर्यंत वाहतूक कोंडी गेलीय. पुण्याच्या बाजूला १० ते १२ किमी वाहतूक कोंडी झालीय. गॅस लिकेजचं प्रमाण कमी होईपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल.

mumbai pune expressway traffic update

वाहतूक वळवली

पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक ताम्हिणी घाट मार्गे आणि कर्जत मार्गे मुंबई-ठाण्याकडे वाहतूक सुरू केल्यानं प्रवाशांचा त्रास कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

mumbai pune expressway traffic update

पर्यायी मार्ग

१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. २. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे.mumbai pune expressway traffic update

mumbai pune expressway traffic update

वेळ जास्त लागणार

पोलिसांनी लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळण्याचं आवाहन केलंय. या मार्गे प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे असंही सांगितलंय.

mumbai pune expressway traffic update

गाडीतील शिल्लक टायरला स्टेपनी का म्हटलं जातं? काय आहे कारण?

Stepney Tyre History

इथं क्लिक करा