मुंबई-पुणे मिसिंग लिंक १३ किमी लांब, १३२ मीटर उंचीवर पूल; भूकंप-वादळ पेलण्याची क्षमता, साडेसहा हजार कोटी खर्च

सूरज यादव

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे

मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई प्रवासात खंडाळा घाटात होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसंच प्रवासाचा वेळही कमी होईल.लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

वेळ आणि अंतर वाचणार

मिसिंग लिंकवर ८ मार्गिका आहेत. या मार्गामुळे ६ किमी अंतर कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत २५ मिनिटांची बचत होणार आहे.

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

१३२ मीटर उंच

मिसिंग लिंक पूल १३२ मीटर उंचीवर असून केबल स्टेड पूल हा अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. चार वर्षांपासून याचं काम सुरू होतं.Mumbai Pune Missing Link

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

१३ किमी लांब

मिसिंग लिंकवर बोगदा आणि पुलाची लांबी मिळून एकूण अंतर १३.३ किमी इतकं आहे. यावर बोगद्याची रुंदी ही २३ मीटर इतकी आहे. केबल स्टेड पुलाची लांबी ६५० मीटर इतकी आहे. तर खांबाची उंची ही १८२ मीटर इतकी आहे.

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

वादळ, भूकंप पेलणार

केबल स्टेड पूल हा वादळी वारे आणि भूकंपातही सक्षमपणे उभा राहू शकतो. २५२ किमी प्रतीतास वेगाचे वारे६.५ रिश्टर स्केल भूकंप सहन करण्याची क्षमता यात आहे.

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

२ हजार कामगार

चार वर्षात या पुलाचे काम करण्यासाठी २ हजारांपेक्षा जास्त कामगार जटत होते. या पुलासाठी ३६ हजार टन लोखंड आणि ४० हजार टन सिमेंट वापरण्यात आलंय.

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

बोगद्यात सेन्सर

मिसिंग लिंकवर असलेल्या बोगद्यात आयटीएमएस आणि एनपीआर कॅमेरे बसवले आहेत. तसंच वाहनाला आग लागल्यास किंवा बोगद्यात तापमान ६० डिग्रीपेक्षा जास्त झाल्यास सेन्सरद्वारे पाण्याचे फवारे सुरू होतात.

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

वेगमर्यादा

मिसिंग लिंकवरून १२० किमी वेगाने प्रवास करता येईल. पण सध्या ८० ते १०० किमी प्रतीतास वेगाची मर्यादा आहे. मिसिंग लिंकसाठी ६ हजार ६९५ कोटी रुपये खर्च झाला आहे.

Mumbai Pune Missing Link

|

Esakal

जगातील ८ रहस्यमय ठिकाणं, जिथं जाणं शक्य पण परतणं अशक्य

Most Dangerous Places in the World

|

esakal

इथं क्लिक करा