Mumbai Pune Tourist Places : 2–3 तासांत स्वर्गसुख अनुभवाल! मुंबई–पुण्याजवळची 'ही' ठिकाणं सुट्टीसाठी का आहेत बेस्ट?

सकाळ डिजिटल टीम

सुट्टीचा प्लान आखताय? मुंबई–पुण्याजवळची ठिकाणे पाहाच

सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन शोधताय, पण फार लांब प्रवास नकोय? मग, मुंबई–पुण्याच्या आसपासची ही सुंदर आणि सहज पोहोचता येणारी पर्यटनस्थळे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. कमी वेळेत ताजेतवाने होण्यासाठी ही ठिकाणे अगदी योग्य आहेत.

Mumbai Pune Tourist Places

|

esakal

दिवेआगर

मुंबईपासून सुमारे साडेचार तासांच्या अंतरावर असलेले दिवेआगर हे नयनरम्य समुद्रकिनारी गाव आहे. स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा, नारळ–पोफळीच्या बागा आणि निसर्गाची प्रसन्न शांतता यामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरते. शांतपणे सुट्टी घालवायची असेल, तर दिवेआगर हा उत्तम पर्याय आहे.

Mumbai Pune Tourist Places

|

esakal

अलिबाग

अलिबाग हे नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण राहिले आहे. मुंबईपासून अगदी जवळ असल्याने दोन दिवसांची सुट्टी येथे आरामात एन्जॉय करता येते. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि शांत वातावरण यामुळे अलिबाग कायमच पर्यटकांना आकर्षित करतं.

Mumbai Pune Tourist Places

|

esakal

माथेरान

मुंबईजवळ वसलेले माथेरान हे एक शांत, निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. रेल्वेनेही येथे सहज जाता येते. छोटंसं असूनही येथील आल्हाददायक हवामान, दाट हिरवळ आणि वाहनमुक्त परिसर मनाला विलक्षण शांतता देतो.

Mumbai Pune Tourist Places

|

esakal

माळशेज घाट

मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेला माळशेज घाट निसर्गप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे. घनदाट हिरवी वनराई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि पावसाळ्यात कोसळणारे धबधबे पाहून सगळा थकवा क्षणात नाहीसा होतो. कल्याण, मुरबाड आणि शहापूर मार्गे येथे सहज पोहोचता येते.

Mumbai Pune Tourist Places

|

esakal

दापोली

तीन ते चार दिवसांची सुट्टी असेल, तर दापोलीचा प्लान नक्की करा. स्वच्छ समुद्रकिनारे, बोट राईड, डॉल्फिन दर्शन यांचा आनंद येथे घेता येतो. त्यासोबतच अस्सल कोकणी खाद्यपदार्थांचा स्वाद घेण्याचीही उत्तम संधी मिळते.

Mumbai Pune Tourist Places

|

esakal

कर्जत

मुंबई–पुण्याच्या जवळच असलेले कर्जत हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान येथे हवामान अत्यंत सुखद असते. मोरबे धरण, पेब किल्ला, कोंढाणे लेणी यांसारखी अनेक आकर्षणे असल्याने साहसी आणि निसर्गप्रेमी पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

Mumbai Pune Tourist Places

|

esakal

Maharashtra Tourism : आयुष्यात एकदा तरी इथं फिरलाच पाहिजे! महाराष्ट्रातील टॉप 10 ठिकाणं पाहून थक्क व्हाल

Maharashtra Tourism

|

esakal

येथे क्लिक करा...