Sandip Kapde
मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत तुफान पावसाने हाहाकार उडवला आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर सेवा उशिराने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
eसकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे संध्याकाळच्या वेळेस चाकरमानी अडकून पडले.
मंत्रालयात पावसामुळे शुकशुकाट दिसून आला आणि कर्मचाऱ्यांना चार वाजता कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली.
मुंबईतील अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
मुंबईतील अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.मुंबई मेट्रो 3 च्या भूमिगत स्थानकात छत कोसळून पाणी गळती झाली, त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले.
पावसामुळे बंद पडलेल्या वाहनांना ट्राफिक पोलिसांनी मदत करत समाजमाध्यमांवर व्हिडीओ शेअर केला
ठाण्यातील चिखलोली धरणात एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
आदित्य ठाकरेंनी महापालिकेवर टीका करत सांगितले की, यंदा पाणी उपसण्याचे काम योग्य वेळी सुरू झाले नाही.
लालबाग, परळ परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.