पुजा बोनकिले
मुंबईत सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास अतिशय महत्वाचे असे हवामान विभागाने सांगितले आहे.
मुंबई KEM हॉस्पिटल येथील जुन्या इमारतीमध्ये ग्रॉऊंड फ्लोअर मध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे सर्वजण हैराण झाले आहे.
मुंबईत मे महिन्यात काही भागांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि पाणी साचले आहे.
सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे.
सोशल मीडियावर देखील मुंबईच्या पहिल्या पावसाने फोटो व्हायरल होत आहेत.
सीएसटी येथे मुसळधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे महानगरातील अनेक भागात पाणी साचले आहे. या फोटोत बस पाण्यात फसलेली दिसत आहे.
मुंबईच्या नौदलाच्या किनाऱ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. पहिल्याच पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
दादर पश्चिम रेल्वे स्थानक पाणी उपलब्ध आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सद्यस्थिती
मुंबईतील गांधी मार्केटजवळ पूर्णपणे पाणी साचले आहे.