सूरज यादव
देशातला पहिला एलिवेटेड नेचर ट्रेल वॉकवे मुंबईत तयार करण्यात आलाय. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तो सगळ्यांसाठी खुला केला आहे.
लाकडी पुलाचा हा रस्ता ४५८ मीटर लांब असून रुंदी अडीच मीटर इतकी आहे. मुंबईतल्या मलाबार हिल इथं हा वॉकवे आहे.
दक्षिण मुंबई कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशहा मेहता उद्यान इथं ट्री टॉप वॉकची संधी यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना मिळणार आहे.
मुंबईतल्या जैवविविधतेचं दर्शन यातून होणार आहे. १०० पेक्षा जास्त वनस्पती, वेगवेगळे पक्षी पाहता येतील. समुद्राचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी सी व्हिविंग डेकही असणार आहे.
ऑनलाइन तिकीट बूकिंग सिस्टिम असून वॉक वे साठी वेळेचा स्लॉटही बूक करावा लागेल. पहाटे पाच ते रात्री ९ यावेळीत सुरू असेल.
वॉक वे पाहण्यासाठी एक तासच असणार आहे. एकदा तिकिट काढल्यानंतर एका तासासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसंच या एका तासात फक्त २०० जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांसाठी हा वॉकवे उघडला असून यासाठी शुल्क आकारले जाते. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी १०० रुपये इतकं शुल्क आहे.
Ghibli स्टाइल फोटो फ्री तयार करा? कसा?