Municipal Corporation Election : मतदानासाठी १२ पैकी एक पुरावा चालणार, पाहा लिस्ट

सूरज यादव

मतदान ओळखपत्र

महापालिका निवडणुकीसाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. इतर १२ ओळखीच्या पुराव्यापैकी एक पुरावा मान्य केला जाईल.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

इतर १२ पुरावे

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

आधार, पासपोर्ट

भारताचे पारपत्र (पासपोर्ट), आधार ओळखपत्र किंवा वाहन चालविण्याचा परवानासुद्धा ओळखीचा पुरावा म्हणून मतदानासाठी ग्राह्य धरला जाईल.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

पॅनकार्ड

आयकर विभागाकडील ओळखपत्र, केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रेही मतदानासाठी नेता येतील.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

पासबूक

राष्ट्रीयीकृत बँका अथवा टपाल खात्यामधील खातेदाराचे पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग दाखला हेसुद्धा मतदान ओळखपत्र म्हणून दाखवता येईल.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

योजनेतील ओळखपत्र

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा किंवा अवलंबित व्यक्तींची निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे मतदानावेळी ओळखीचा पुरावा माना जाईल.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

लोकप्रतिनिधींचे ओळखपत्र

लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/विधान परिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्रही मतदानासाठी चालेल.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

आरोग्य विमा योजना कार्ड

स्वातंत्र्यसैनिकाचे ओळखपत्र, सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे कार्डही मतदानाला ओळखीचा पुरावा म्हणून मान्य केलं जाईल.

Municipal Election One Of 12 ID Proofs

|

Esakal

Tata Punch Facelift Launch : CNGसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ६ रंगात उपलब्ध; किंमत किती?

Tata Punch Facelift Launch

|

Esakal

इथं क्लिक करा