झणझणीत कोळंबी मसाल्याची खास महाराष्ट्रीयन रेसिपी!

Aarti Badade

अस्सल समुद्री चवीचा बेत!

अस्सल मराठी चवीचा झणझणीत कोळंबी मसाला आता बनवा कोणत्याही वाटणाशिवाय अतिशय सोप्या पद्धतीने.

kolambi Masala

|

Sakal

काय काय लागेल? (साहित्य)

साहित्य: २५० ग्रॅम कोळंबी, २ बारीक चिरलेले कांदे, १ टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, गरम मसाला, लिंबाचा रस, तेल, कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

kolambi Masala

|

Sakal

मॅरिनेशन

स्वच्छ केलेल्या कोळंबीला लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून १५ मिनिटे बाजूला ठेवा.

kolambi Masala

|

sakal

फोडणी आणि मसाला तयारी

कढईत तेल गरम करून कांदा आणि आले-लसूण पेस्ट सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्या.

kolambi Masala

|

Sakal

टोमॅटो आणि मसाल्यांची फोडणी

चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि सर्व सुके मसाले घालून तेल सुटेपर्यंत चांगले शिजवून घ्या.

kolambi Masala

|

Sakal

कोळंबी शिजवताना घ्या काळजी

मॅरीनेट केलेली कोळंबी मसाल्यात घालून केवळ ५ ते ७ मिनिटे मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवा.

kolambi Masala

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा!

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून हा झणझणीत मसाला भाकरी किंवा वाफाळलेल्या भातासोबत खाण्यास तयार आहे.

kolambi Masala

|

Sakal

31 डिसेंबर पार्टीसाठी परफेक्ट! झणझणीत महाराष्ट्रीयन मटण खरड्याची खास रेसिपी

Mutton Kharda

|

Sakal

येथे क्लिक करा