मुरलीधर मोहोळ: नगरसेवक ते केंद्रीय मंत्री

आशुतोष मसगौंडे

खासदार

भाजपच्या महाराष्ट्रात निवडून आलेल्या काही मोजक्या खासदारांमध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.

Murlidhar Mohol | Esakal

पंतप्रधान कार्यालयातून संपर्क

मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून, त्यांना पंतप्रधान कार्यालयातून अधिकृत संपर्क साधण्यात आला आहे.

Murlidhar Mohol | Esakal

पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव

पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळ हे एकमेव खासदार मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असणार आहेत.

Murlidhar Mohol | Esakal

क्रीडा व युवक कल्याण खात्ये मिळण्याची शक्यता

यावेळी मुरलीधर मोहोळ यांचाा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

Murlidhar Mohol | Esakal

दणदणीत विजय

यंदाच्या निवडणुकीत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तब्बल एक लाख २३ हजार इतक्या मताधिक्याने विजय मिळवला.

Murlidhar Mohol | Esakal

नगरसेवक ते केंद्रीय मंत्री

कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

Murlidhar Mohol | Esakal

स्पर्धांचे आयोजन

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या उपक्रम उपक्रमांद्वारे लोकांचे व पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेतले.

Murlidhar Mohol | Esakal

कुस्तीपटू

मोहोळ हे स्वतः पहिलवान आहेत, कुस्तीसह वेगवेगळ्या खेळांची मोहोळ यांना चांगली माहिती आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवून त्यांनी आपल्यातील खेळाडूची चुणूक दाखवून दिली होती.

Murlidhar Mohol | Esakal

बुमराह-संजनाची प्रसिद्ध FRIENDS च्या सेटला भेट

Jasprit Bumrah Sanjana Ganesan | Instagram