Aarti Badade
डोळे केवळ बघण्यासाठी नाही, तर शरीराच्या आरोग्याचे संकेत देतात. मधुमेहामुळे डोळ्यांवर होऊ शकतो गंभीर परिणाम
रक्तातील साखर जास्त राहिल्यास डोळ्यांच्या नसांवर दबाव पडतो. सुरुवातीला लक्षणे नसली तरी दृष्टी कमजोर होऊ शकते.
मधुमेहामुळे डोळ्यातील लहान रक्तवाहिन्या खराब होतात. दुर्लक्ष केल्यास अंधत्व येऊ शकते.
मॅक्युला भागात द्रव साचतो. अस्पष्ट, ढगाळ दिसायला सुरुवात होते
मधुमेहींना मोतीबिंदू लवकर होतो. लेन्स पांढरी होत जाते आणि स्पष्ट दिसेनासं होतं.
डोळ्यांत दबाव वाढतो. नसांवर परिणाम होऊन दृष्टी हळूहळू जाते
रेटिना जागेवरून सरकतो. ही वैद्यकीय आणीबाणी असून उपचार न केल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा,दरवर्षी नेत्रतपासणी करा,धूम्रपान टाळा,सकस आहार व नियमित व्यायाम करा
सुरुवातीला लक्षणे नसली तरी वेळेवर लक्ष दिल्यास दृष्टी वाचवता येते. मधुमेह नियंत्रणात ठेवा आणि डोळ्यांचं संरक्षण करा!