संतोष कानडे
इस्रायल हे तसं ज्यू धर्मिय लोकांचं राष्ट्र आहे. हा देश इराण, पॅलेस्टाईन, गाझा पट्टी इथं कायम हल्ले करत असतो.
इस्रायलमध्ये मुस्लिम लोक राहतात का, त्यांची अवस्था कशी आहे, त्यांना राजकीय, सामाजिक आव्हानं काय आहेत, याबाबत माहिती पाहू.
इस्रायलची लोकसंख्या वेळ ९६ लाख ते १ कोटीच्या घरात आहे. त्यामध्ये १८ ते २१ टक्के मुस्लिम राहतात. म्हणजे २० लाखांच्या आसपास.
इस्रायलमध्ये राहणारे मुस्लिम हे प्रामुख्याने अरब मुस्लिम आहेत. यातील बहुसंख्य सुन्नी मुस्लिम आहेत.
मुस्लिमांना एकीकडे कायदेशीर हक्क तर आहेत, मात्र मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक आव्हानं आहेत.
मागच्या दोन वर्षांतील गरीबीच्या अहवालानुसार ज्यूंच्या तुलनेत मुस्लिमांच्या गरीबीचे प्रमाण जास्त आहेत. ३७ टक्के मुस्लिम कुटुंबे गरीबी रेषेखाली आहेत.
इस्रायलमध्ये लग्न, घटस्फोट, पोटगी, वारसाहक्क असे विषय धार्मिक कोर्टात सोडवले जातात.
ज्यू लोकांसाठी रॅबिनिकल कोर्ट, मुस्लिम लोकांसाठी शरिया कोर्ट, ख्रिश्चन आणि ड्रुझ लोकांसाठी धार्मिक न्यायालयाचे नियम लागू आहेत.
इस्रायलमध्ये मुस्लिमांवर थेट लोकसंख्येचं बंधन नसलं तरी मुस्लिम बहुल गावांना किंवा शहरांना विस्तारासाठी जमिनीच्या परवानग्या सहजसहजी मिळत नाहीत.
मागच्या काही वर्षांपासून मुस्लिम जन्मदर कमी झाला आहे. पूर्वी प्रति महिला ६-७ असा जन्मदर होता. आता तो २.९ ते ३ पर्यंत खाली गेलाय.