संतोष कानडे
होर्मुजची समुद्रधुनी हा जगातला सर्वात संवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. अनेक देशांच्या साधन-सामुग्रीचा हाच मार्ग आहे.
या समुद्रधुनीच्या एका बाजूला इराण आहे तर दुसऱ्या बाजूला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत.
होर्मुजची समुद्रधुनी पर्शियन आखात आणि ओमानचं आखात यांना जोडते. हे अत्यंत अरुंद ठिकाण आहे.
३३ किलोमीटर एवढी अरुंद ही समुद्रधुनी आहे. मोठ्या जहाजांसाठीचा केवळ ३ किलोमीटर इतकाच हा मर्यादित मार्ग आहे.
जगातल्या एकूण खनिज तेल उत्पादनाचा २० ते २५ टक्के पुरवठा याच समुद्रधुनीतून होत असतो. कतारची नैसर्गिक वायू वाहतूक इथूनच होत असते.
भारतदेखील गरजेच्या कच्च्या तेलापैकी अधिकचा वाटा, याच समुद्रधुनीतून आयात करतो. हा मार्ग बंद झाला तर इंधनाचे दर वाढतात.
भौगोलिक परिस्थितीमुळे या मार्गावर इराण देशाचं वर्चस्व आहे. जेव्हा इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात तणाव वाढतो, तेव्हा इराण हा मार्ग बंद करण्याची धमकी देतो.
मात्र सध्या सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुजची समुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ चीन या मार्गावरुन वाहतूक करेल, असं इराणचं म्हणणं आहे.
हा मार्ग बंद होणं म्हणजे जगाची अर्थव्यवस्था ठप्प होण्यासारखं आहे. कारण या समुद्रधुनीतून सर्वाधिक तेल वाहून नेले जाते.