पुजा बोनकिले
जर पावसानंतर तुमच्या कपाटात ठेवलेल्या कपड्यांना दुर्गंधी येऊ लागली असेल तर पुढील उपाय करु शकता.
कपड्यांमधून येणारा ओलावा वास तुम्ही वाळलेल्या लिंबाच्या साली वापरून दूर करू शकता .
गुलाबपाण्याचा वापर त्वचेला चमक देण्यासाठी केला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का की कपड्यांवरील ओल्यापणाचा वास दूर करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता.
कढीपत्ता, जे अन्नाला चव देण्यासाठी आणि केसांशी संबंधित समस्यांसाठी वापरले जाते, ते तुमच्या कपड्यांमधून दुर्गंधी देखील दूर करू शकते.
तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लवंग आणि कापूरचा वास खूप तीव्र असतो. अशा परिस्थितीत, कपाटात ठेवलेल्या कपड्यांचा वास दूर करण्यासाठी तुम्ही या दोन्ही गोष्टी वापरू शकता .
तुम्ही आंघोळीचा साबण किसून कापडात बांधू शकता. यामुळे देखील कपड्यांचा कुबट वास कमी होऊ शकतो.
वरील उपाय पावसाळ्यात नक्की ट्राय करु शकता.