महाराष्ट्रात तिळाचे लाडू अन् वडी, तर भारताच्या इतर भागांत संक्रांतीनिमित्त बनतात हे खास पारंपरिक पदार्थ

Anushka Tapshalkar

मकर संक्रांतीची धामधूम सुरू

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीमुळे देशभरात सणाची लगबग आणि पारंपारिक पदार्थांची तयारी सुरू आहे. देशातील विविध राज्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे जे पदार्थ बनवले जातात ते जाणून घेऊया.

Traditional Makar Sankranti Food Dishes Across India

|

sakal

तिळाचे लाडू, पुरणपोळी - महाराष्ट्र

संक्रांत साजरी करताना तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व आहे. तिळाचे लाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे. तसेच हरभरा डाळ आणि गुळाच्या सारणाने बनवलेली पूरणपोळी संक्रांतीच्या सणात हमखास केली जाते.

Til Ladoo and Puranpoli- Maharashtra

|

sakal

खिचडी - बिहार

मकर संक्रांतीला बिहारमध्ये भाज्या आणि तूप घालून बनवलेली पौष्टिक खिचडी खास मानली जाते.

Khichdi - Bihar

|

sakal

गोड पायेश - पश्चिम बंगाल

दूध, तांदूळ आणि खजूराच्या गुळापासून बनवलेला पायेश हा बंगालचा पारंपारिक गोड पदार्थ आहे.

Payesh - West Bengal

|

sakal

पोंगल पदार्थ - तामिळनाडू

सक्करई पोंगल (गोड) आणि वें पोंगल (खारट) हे संक्रांतीचे प्रमुख पदार्थ आहेत.

Pongal- Tamilnadu

|

sakal

उंधियूची खास मेजवानी - गुजरात

हंगामी भाज्यांनी बनलेला उंधियू संक्रांतीला जलेबी किंवा पूर्‍यांसोबत खाल्ला जातो.

Undhiyu- Gujarat

|

sakal

मकर चाऊळा प्रसाद - ओडिशा

नव्या तांदळात केळी, खोबरे, गूळ आणि दूध मिसळून बनवलेला हा खास नैवेद्य आहे.

Makar Chaula Prasad - Odisa

|

sakal

गजक आणि रेवडी - उत्तर भारत

थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारी गजक-रेवडी संक्रांती आणि लोहरीला खास असते.

Gajak and Revadi - North India

|

sakal

अरिसेलू - आंध्र प्रदेश-तेलंगणा

तांदळाचे पीठ आणि गुळापासून बनवलेले तळलेले अरिसेलू हा पारंपारिक गोड पदार्थ आहे.

Ariselu - Telangana

|

sakal

लोहरीचे पदार्थ - पंजाब

पंजाबमध्ये लोहडीच्या दिवशी तीळ, गूळ, शेंगदाणे, मका आणि रेवडी यांचा समावेश असलेले पदार्थ खाल्ले जातात.

Lohri Bhog - Panjab

|

sakal

Makar Sankranti 2026: वर्षभर भरभराटीसाठी संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका करणं टाळाच

Avoid These Mistakes on Makar Sankranti for Good Fortune

|

sakal

आणखी वाचा