Aarti Badade
पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेच शहराच्या जवळ एक असं शांत आणि सुंदर ठिकाण आहे, ज्याच्या सौंदर्याने अनेक पर्यटक थक्क होत आहेत.
Ramdara Temple Pune
sakal
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर जवळ वसलेले 'रामदरा मंदिर' हे अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याचा एक अनोखा संगम आहे.
Ramdara Temple Pune
Sakal
तलावाच्या किनारी वसलेले हे मंदिर आणि सभोवतालचा हिरवागार परिसर पाहून तुम्हाला एखाद्या स्वर्गीय ठिकाणावर आल्याचा भास होईल.
Ramdara Temple Pune
Sakal
हे मंदिर मुख्यत्वे भगवान शंकरांना समर्पित आहे, मात्र येथे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि दत्तगुरूंच्या अतिशय सुंदर मूर्तींचे दर्शन मिळते.
Ramdara Temple Pune
Sakal
रामदरा मंदिराची उभारणी १९७० साली करण्यात आली असून, गेल्या काही वर्षांत हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.
Ramdara Temple Pune
Sakal
पुण्यापासून सुमारे ५० किमी अंतरावर असल्याने, शहराच्या गजबजाटापासून दूर एक दिवसाच्या सहलीसाठी हे ठिकाण सर्वात बेस्ट आहे.
Ramdara Temple Pune
Sakal
पाण्याचा निळसर रंग, सभोवतालची झाडे आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण फोटोग्राफी प्रेमींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श डेस्टिनेशन ठरत आहे.
Ramdara Temple Pune
Sakal
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी येथील दृश्य अधिक मनोहारी असते. मनाला शांती मिळवण्यासाठी या निसर्गरम्य मंदिराला एकदा नक्की भेट द्या.
Ramdara Temple Pune
Sakal
Amboli Hill Station
sakal