Saisimran Ghashi
"स्वर्ग ज्याला म्हणतात, ती नीलम व्हॅली!" कश्मीरचा हा भाग पाकव्याप्त कश्मीरमध्ये असून, याला 'मिनी स्वित्झर्लंड' असंही म्हटलं जातं.
समुद्रसपाटीपासून 4000 मीटर उंचीवर असलेली ही घाटी 200 किमी क्षेत्रात पसरलेली आहे. बर्फाच्छादित शिखरे, हिरवे जंगल आणि निळसर नद्या यांचा सुरेख मिलाफ!
नीलम नदीच्या दोन्ही काठांवर उंच पर्वतरांगा आणि शांत झरे. इथे आल्यावर मन नक्कीच प्रसन्न होतं.
जून ते सप्टेंबर दरम्यान येथे फिरण्याचा सर्वोत्तम कालावधी असतो. 15 जुलै ते 31 ऑगस्ट ही टूरिस्ट सीझनची पीक वेळ.
बॉर्डरपलीकडील स्कार्दू हे पर्यटनाचे अद्भुत ठिकाण आहे. शांत तलाव, बर्फाळ पर्वत आणि थंडीचा थरार अनुभवायला मिळतो.
स्वात घाटीला 'पूर्वेची स्वित्झर्लंड' म्हटलं जातं. डोंगराळ भाग आणि इतिहासात रमणारी संस्कृती यांचं हे केंद्र.
अयून व्हॅली चित्रालपासून थोड्या अंतरावर आहे. हिरवळ कमी असली तरी, डोंगरांची दृश्यं डोळे दिपवणारी आहेत.
या भागातील लोकसंस्कृती, पारंपरिक कपडे, खाद्यपदार्थ आणि जीवनशैली पर्यटकांना भारावून टाकते.
मुजफ्फराबाद येथून नीलम व्हॅलीकडे जाण्यासाठी स्थानिक वाहतूक किंवा खासगी वाहनाचाही पर्याय उपलब्ध आहे.
जगातल्या नंदनवनाला एकदा तरी भेट द्या. POK मधील निसर्गाचं हे खरंखुरं रूप कायमचं लक्षात राहील.