मटण खाण्यापूर्वी सावधान! ‘या’ लोकांनी घ्या काळजी

Aarti Badade

मटण खाणं कोणासाठी ठरू शकतं त्रासदायक?

मटणामध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात; मात्र काही आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी मटण खाताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Mutton Consumption

|

Sakal

हृदयरोग आणि उच्च कोलेस्ट्रॉल

मटणातील सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा बॅड कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्यांनी त्याच्या सेवनावर मर्यादा ठेवावी.

Mutton Consumption

|

Sakal

युरिक ॲसिड आणि गाउटचा त्रास

मटणामध्ये प्युरिन्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे युरिक ॲसिड वाढण्याची आणि सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज येण्याची शक्यता असते.

Mutton Consumption

|

Sakal

किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी घ्या काळजी

मटणातील जास्त प्रथिनांमुळे किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, त्यामुळे मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचे सेवन करावे.

Mutton Consumption

|

Sakal

पचनाच्या समस्या असल्यास टाळा अति सेवन

मटण पचायला जड जाऊ शकतं, त्यामुळे वारंवार गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास असणाऱ्यांनी ते खाताना काळजी घ्यावी.

Mutton Consumption

|

Sakal

वजन कमी करायचंय? मटण खाताना काळजी घ्या

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा लठ्ठपणाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी मटणाचे प्रमाण आणि ते बनवण्याची पद्धत याकडे लक्ष द्यावे.

Mutton Consumption

|

Sakal

मटण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुम्हाला हृदयरोग, किडनीचा त्रास, गाउट किंवा पचनाच्या समस्या असतील, तर मटण किती आणि किती वेळा खावे याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Mutton Consumption

|

Sakal

श्रीमंतीचा मार्ग दाखवणारी चाणक्यांची 3 सूत्रं; आजच जाणून घ्या!

chanaky niti 

|

Sakal

येथे क्लिक करा